

बार्शी प्रतिनिधी :-बार्शी येथील यशोदा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित अभिनव प्राथमिक विद्यामंदिर बार्शी, येथे अभिनव टॅलेंट सर्च परीक्षेचा बक्षीस वितरण कार्यक्रम पार पडला, सदर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून नगरपालिका शिक्षण मंडळ बार्शीचे प्रशासन अधिकारी श्री. अनिल बनसोडे साहेब, तसेच नगरपालिका शिक्षण मंडळ चे पर्यवेक्षक ,श्री संजय पाटील साहेब ,संस्था प्रतिनिधी म्हणून श्री मोहन लोहार सर उपस्थित होते .परीक्षेमध्ये क्रमांक प्राप्त केलेल्या इयत्ता 1ली ते 4 थी मधील एकूण पंधरा विद्यार्थ्यांचा ट्रॉफी, प्रमाणपत्र व गुलाब पुष्प देऊन पाहुण्यांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला. या मध्ये *स्टार माझा न्यूज* चे संपादक रियाज पठाण यांची कन्या , हमेरा रियाज पठान इयत्ता 1 ली हिने द्वितीय क्रमांक पटकावला आहे. प्रमुख पाहुण्यांच्या मनोगतात श्री बनसोडे साहेबांनी विद्यार्थ्यांना आरोग्य विषयी तसेच स्पर्धा परीक्षा विषयी माहिती सांगितली व शाळेतील शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.या कार्यक्रमासाठी पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रस्ताविक शाळेचे मुख्याध्यापक भालेराव सर यांनी केले व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील सहशिक्षिका श्रीमती सोनवतीकर मॅडम यांनी केले व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शाळेतील शिक्षक श्री लंकेश्वर सर यांनी केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील श्री डोंगरे मॅडम श्रीमती मोठे मॅडम श्रीमती मस्के मॅडम श्रीमती सरवदे मॅडम यांनी परिश्रम घेतले .