संपादक :- प्रदीप माळी. 9689264436. दि :- 22/4/2022 , Tv9solapur.com

बार्शी – केंद्र सरकारच्या आझादी का अमृत महोत्सव कार्यक्रम अंतर्गत, तालुकास्तरीय आरोग्य मेळाव्याचे उद्घाटन ग्रामीण रुग्णालय बार्शी येथे आमदार राजाभाऊ राऊत यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
या आरोग्य मेळाव्यामध्ये सर्वरोग मोफत तपासणी व उपचार करण्याचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये बालरुग्ण तपासणी, कुटुंब नियोजन सल्ला, स्त्री रोग व गरोदरपणा तपासणी, आर.टी.आय. / एस.टी.आय. तपासणी, कुष्ठरोग तपासणी, नेत्र तपासणी, असंसर्गजन्य रोग तपासणी, एच.आय.व्ही. तपासणी कॅन्सर तपासणी, दंत विकार तपासणी, नाक-कान-घसा विकार तपासणी, त्वचाविकार तपासणी, रक्त तपासणी, कुटुंबनियोजन साधनांचे वाटप, आयुश उपचार पद्धती, युनानी उपचार पद्धती, सिद्धा उपचार पद्धती, होमिओपॅथी उपचार पद्धती आदी तपासण्या व उपचार पद्धतीचा लाभ रुग्णांकरीता देण्यात आला.
त्याचबरोबर या मेळाव्यात केंद्र सरकारच्या डिजिटल हेल्थ कार्ड व आयुष्यमान भारत कार्डचे वाटप करण्यात आले.
या मेळाव्यास जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, ग्रामीण रुग्णालय अधीक्षक डॉ. शितल बोपलकर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.अशोक ढगे, डॉ. रवींद्र माळी, नायब तहसीलदार संजीवन मुंढे, बालरोग तज्ञ, स्त्रीरोग तज्ञ, जनरल फिजिशियन, जनरल सर्जन, भूलतज्ञ व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.
Support authors and subscribe to content
This is premium stuff. Subscribe to read the entire article.