संपादक :- प्रदीप माळी . 9689264436. दि :- 16/4/2022, Tv9solapur.com
बार्शी :- बार्शी शहरातील भवानी पेठ, चिंतामणी मंदिर परिसर, तसेच मांगडे चाळीतील काही भागात पंधरा ते वीस दिवसापासून दूषित पाणीपुरवठा होत आहे. तर भवानी पेठ चिंतामणी मंदिर परिसराजवळ मुतारी जवळ पाईप लाईन लिकेज असल्यामुळे त्या भागातील पाणी दूषित व खडूळ गेले तीन महिने येत असून तेथील नागरिकांनी संबंधित अधिकाऱ्याला तक्रार केली असतात लवकरच त्यावर उपाय योजना करतो असे सांगण्यात आले परंतु अजून कुठलीही उपाययोजना केलेली नाही.
वरील भागात पाणी आल्यावर पहिले 20 ते 25 मिनिटे दूषित पाणीपुरवठा होतो. त्यानंतर पाणी स्वच्छ येते, परंतु पाण्याला वास व पिवळट कलर येतो.बहुतेक गटारीचे पाणी नळातील पाण्यात मिक्स होते असा अंदाज नागरिकांमधून वर्तविला जात आहे. पाण्याची पाईपलाईन कुठेतरी लिकीज असल्यामुळे गटारीतील घाण पाणी या पाईपद्वारे नळाला येते.
यावर त्वरित उपाययोजना करणे गरजेचे आहे. घरपट्टी नळपट्टी साठी जसे प्रशासन लोकांना वेटीस धरत आहे. तसेच लोकांच्या आरोग्याचा ही त्यांनी विचार केला पाहिजे.
संबंधित प्रशासनाने लवकरात लवकर यावर उपाययोजना केली नाही तर येथील नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
Support authors and subscribe to content
This is premium stuff. Subscribe to read the entire article.