संपादक : प्रदीप माळी, 96 89 26 44 36. दि : 1/11/2021, tv9 solapur.com
मुंबई : राज्यातील एसटी ही सर्वसामान्य माणसांची जीवनवाहीणी आहे. दिवाळीच्या सणामुळे प्रवाशी जनतेची गर्दी वाढणार आहे. त्यामुळे त्यांच्या प्रवासाची गैरसोय टाळण्यासाठी तसेच जनतेची एसटिवरील विश्वास जपण्यासाठी अघोषित संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांनी कामावर तातडीने रुजू व्हावे, जनतेची एसटीशी असलेली नाळ तुटू देऊ नका, असे आवाहन परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी केले. एसटी कर्मचाऱ्यांबाबत आपण दिवाळीनंतर चर्चा करणार असल्याचेही ॲड. अनिल परब यांनी सांगितले आहे.
दिवाळी सणाच्या पार्श्वभूमिवर ऑक्टोबर महिन्याचे वेतन नोव्हेंबर महिन्याच्या 1 तारखेला म्हणजेच दिवाळीपूर्वी देण्याची जाहिर केले होते. त्यानुसार सुधारीत महागाई व घरभाडे भत्त्यासह ऑक्टोबर 2021 चे वेतन त्याचबरोबर दरवर्षी दिली जाणारी दिवाळी भेट आज सर्व कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे, अशी माहिती ॲड. अनिल परब यांनी दिली आहे. गेली दोन वर्षे कोरोना महामारीमुळे एसटी महामंडळ प्रचंड आर्थिक संकटात सापडले असताना देखील आतापर्यंत सर्व कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यात आली आहे.
85 टक्के आगारातील वाहतूक सुरुळीत सुरु असून उर्वरीत 15 टक्के आगारातील वाहतूक विस्कळीत झाली आहे. ही विस्कळीत वाहतूक पूर्ववत करण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांचे सहकार्य अपेक्षित आहे. संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांनी तातडीने कामावर रूजू व्हावे व दिवाळी सणादरम्यान सर्वसामान्य जनतेची गैरसोय होऊ देऊ नये, असे सांगण्यात आले आहे.
Support authors and subscribe to content
This is premium stuff. Subscribe to read the entire article.