दि: 25/7/2021 tv9solapur.com
सोलापूर / बार्शी : बार्शी मध्ये आज दुपारी धक्कादायक दुर्घटना घडली, भावानेच भावाला फोन केला. माझ्या पोटात दुखत आहे, मी दारू पिलो आहे, तरी मला न्यायला ये, असे फोन करून भावाला सांगण्यात आले. त्यांचा भाऊ त्या ठिकाणी पोचेपर्यंत त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करणाऱ्याचे नाव महेश प्रकाश शिंदे (वय ३२, रा. तळेवाडी, सुभाष नगर, बार्शी) असे आहे.
ही घटना बार्शी शहरात घडली. बार्शी मध्ये त्यांचे कपड्याचे दुकान व गॅरेज आहे. ही दुकाने अशोक आणि महेश चालवतात. अशोकला महेशने फोन करून बोलावले. थोड्या वेळाने अशोक महेशला आणण्यासाठी गेला. असता त्यांनी कॅन्सर हॉस्पिटलच्या आसपास पाहिले असता तो त्यांना दिसला नाही. त्यामुळे त्यांनी रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांकडे माझा भाऊ दिसला का अशी विचारपूस केली. परंतु त्याचा पत्ता लागला नाही. तास दोन तास इकडे तिकडे त्याचा शोध घेत असताना कॅन्सर हॉस्पिटलच्या मागील बाजूस असलेल्या लिंबाच्या झाडाला दोरीच्या साहाय्याने महेशने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी अशोक शिंदे याने शहर पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदविण्यास आली. पुढील तपास पोलिस करत आहेत.